मुखपृष्ठ Top News वयाच्या 60व्या वर्षी आशिष विद्यार्थी पुन्हा चढले बोहल्यावर, ‘या’ तरुणीशी झाला विवाह

वयाच्या 60व्या वर्षी आशिष विद्यार्थी पुन्हा चढले बोहल्यावर, ‘या’ तरुणीशी झाला विवाह

by PNI Digital

मुंबई: बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या खलनायकी भूमिकेने लोकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बातमीनुसार, वयाच्या 60 व्या वर्षी आशिष विद्यार्थ्याने गुपचूप दुसरे लग्न केले आहे.

आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. आसामची रहिवासी रुपाली बरुआसोबत अभिनेता आशिष विद्यार्थी विवाहबध्द झाले आहे. दोघांनी आज म्हणजेच 25 मे रोजी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. ज्यांचे काही फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. ही छायाचित्रे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्यामध्ये विवाहबध्द झालेले आशिष आपल्या वधूसोबत पोज देत आहे.

कोलकात्यात झाले आशिष आणि रुपालीचे लग्न

आशिष आणि रुपालीचे लग्न कोलकात्यात झाले. या फोटोंमध्ये आशिषने ऑफ व्हाइट कुर्त्यासोबत लुंगी घातली आहे. दुसरीकडे, आशिषची नववधू देखील पांढऱ्या शेडच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही गळ्यात हार घालून कॅमेरासमोर पोज देत आहेत. रुपाली फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ज्यांचे कोलकातामध्ये फॅशन स्टोअर देखील आहे.

या चित्रपटांमध्ये साकारली भूमिका

रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत झाले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत. आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ‘बिच्चू’, ‘जिद्दी’, ‘अर्जुन पंडित’, ‘वास्तव’, ‘बादल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. अलीकडेच अभिनेते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘गुडबाय’ मध्ये देखील ते दिसले होते. आशिष विद्यार्थी हे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात आणि फूड ब्लॉगिंग देखील करतात.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या