मुंबई: अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा आपल्या चाहत्यांची फिरकी घेण्यापासूनही मागे हटत नाहीत. त्यांनी आज सकाळी सोशल मीडियावर पोलिसांच्या गाडीसोबतचा स्वतःचा मानी खाली घालून उभा असलेला एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले ‘अरेस्टेड’ (अटकेत). त्यांचा हा फोटो व्हायरल झाला आणि त्याच्या चाहतेही आता सक्रिय झाले असून, वेगवेगळ्या कमेंट पोस्ट करत आहे.
80 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मुंबई पोलिसांच्या जीपजवळ उभे असल्याचे दिसत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले ‘अरेस्टेड’ (अटकेत). या पोस्टवर एका चाहत्याने मजेशीर कमेंट केली, ‘डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं… नामुमकिन है।’. दुसऱ्याने लिहिले, ‘सर पुन्हा हेल्मेटशिवाय.’ ‘अखेर डॉनला मुंबई पोलिसांनी पकडले आहे’, अशी टिप्पणी आणखी एका यूजरने केली आहे.
‘त्या’ फोटोमुळे अमिताभ अडचणीत
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर केला होता ज्यात ते बाईकवर होते. मुंबईची ट्राफिक टाळण्यासाठी त्यांनी बाईकवरुन प्रवास केला होता. पण हा फोटो बिग बींसाठी अडचणीचा ठरला. युजर्सनी त्याच्या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली की तो हेल्मेटशिवाय बाइक चालवत आहे. यानंतर मुंबई वाहतूक पोलीसही कारवाईत आले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, बिग बींना दंड भरावा लागला होता, परंतु नंतर त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या फोटोमागील वेगळी कहाणी सांगितली.
या वादावर बिग बींनी दिलं स्पष्टीकरण
अमिताभने सांगितले की बाईक चालवणारा व्यक्ती क्रू मेंबर होता आणि तो कुठेही जात नव्हता, पण मजा करत होता. खरं तर, त्या दिवशी तो शूटिंग करत होता आणि वेळ वाचवण्यासाठी तो बाईक चालवत असल्याचे सांगत फोटो शेअर केला होता.