मुखपृष्ठ Top News प्रभासचा ‘आदिपुरुष’ पुन्हा अडचणीत; तक्रार दाखल, सेन्सॉर बोर्डाकडे केली ‘ही’ मागणी

प्रभासचा ‘आदिपुरुष’ पुन्हा अडचणीत; तक्रार दाखल, सेन्सॉर बोर्डाकडे केली ‘ही’ मागणी

by PNI Digital

मुंबई : अभिनेता प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचा टीझर समोर आला, तेव्हा रावणासह इतर पात्रांच्या लूकवरून बराच गोंधळ झाला. या चित्रपटाला प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली. आता हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी रिलीज केला आहे.

समोर आलेला ‘आदिपुरुष’चा ट्रेलर लोकांना आवडला आहे. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. मात्र, या चित्रपटाचा सुरु झालेला वाद काही थांबताना दिसत नाहीये. आता या चित्रपटाबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत काय म्हटले?

सनातन धर्माचे प्रचारक संजय दीनानाथ तिवारी नावाच्या व्यक्तीने ही तक्रार केली आहे, जेणेकरून या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्यापासून वाचता येईल. याआधी पोस्टरमध्ये निर्मात्यांनी मोठ्या चुका केल्या आहेत, ज्या चित्रपटात पुन्हा घडू शकतात, असे तक्रारीत म्हटले आहे. आणि असे झाल्यास भविष्यात पुन्हा सनातन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सेन्सॉर बोर्डाकडे केली मागणी

अशी विशेष मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डामार्फत चित्रपटाची विशेष स्क्रीन टेस्ट व्हावी आणि चित्रपटातील काही वादग्रस्त दिसल्यास ते काढून टाकावे, असे सांगण्यात आले. आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचे बजेट 500 कोटींहून अधिक आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट ओम राऊत दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे जो श्रीरामची भूमिका साकारत आहे, क्रिती सेनॉन देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे आणि सैफ अली खान लंकेश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात देवदत्त नागे, सनी सिंग असे अनेक स्टार्स आहेत. हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या