नवी दिल्ली (कविता नागवेकर-प्रतिनिधी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरममध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे ते दिल्ली आणि भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे शुक्रवारी दिल्ली सरकारच्या निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. लंडनचे महापौर सादिक खान यांनी अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले आहे. सीएम केजरीवाल हे लंडन, टोकियो आणि न्यूयॉर्कसह जगातील 40 शहरांमधील व्यासपीठावर सहभागी होणार आहेत.
यावर्षी डब्ल्यूसीसीएफची थीम ‘संस्कृतीचं भविष्य’ (Future of culture) ठेवण्यात आला आहे. लंडनच्या महापौरांच्या आमंत्रणाला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आनंद व्यक्त करत म्हणाले की, दिल्ली फोरमच्या वार्षिक परिषदेत भाग घेतल्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. संस्कृती आणि कलाकारासाठी अनुकूल शहर या दृष्टीने दिल्लीला जगाच्या अग्रस्थानी नेणे हे सरकारचे ध्येय आहे. त्याकरिता संस्कृती एक उत्तम मार्ग असेल.
दिल्लीच्या संस्कृती पुन्हा उजाळा
दिल्लीही ‘वर्ल्ड सिटीज कल्चर रिपोर्ट’चा भाग असेल. हा अहवाल शहरांमधील संस्कृतीवरील संपूर्ण जागतिक डेटा गोळा करतो. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही फोरमच्या थीमबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, हा एक प्रासंगिक विषय आहे. वास्तविक कोरोना साथीच्या आजारामुळे गेल्या एक वर्षापासून आव्हानांचा सामना करत दिल्लीची संस्कृतीला पुन्हा उजाळा देण्याची संधी मिळेल. त्याचप्रमाणे शहर बदलण्यात संस्कृतीची भक्कम भूमिका असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितले.