मुखपृष्ठ Top News सर्वसामान्यांना मोठा दिलासा: साबण, तेलासह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होणार

सर्वसामान्यांना मोठा दिलासा: साबण, तेलासह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होणार

by PNI Digital

नवी दिल्ली : महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी साबण, तेल, पेस्ट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि मॅरिको यांसारख्या नोंदणीकृत कंपन्यांच्या सीईओंनी म्हटले की, तृणधान्ये आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे त्यांच्या कमाईत वाढ झाली. त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.

किरकोळ विक्री 6 टक्के वाढली

एसी, फ्रिजच्या किमती वाढणार नाहीत
तांबे आणि अॅल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाच्या किमती स्थिर झाल्यामुळे व्होल्टास, हॅवेल्स आणि ब्लू स्टार सारख्या कंपन्यांनी एसी, फ्रिजसारख्या उत्पादनांच्या किमती वाढवणार नसल्याचे सांगितले आहे. विक्रीवर लक्ष ठेवणारी संस्था नीलसन आयक्यूच्या मते, दीड वर्षाच्या घसरणीनंतर जानेवारी-मार्च प्रथमच ग्रामीण भागातील खप 0.3 टक्के वाढला आहे. तथापि, शहरी भागात विक्री वाढ 5.3 टक्के वर राहिली. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, एप्रिलमध्ये किरकोळ क्षेत्रातील विक्री 6 टक्के वाढली.

यामुळे किंमत कमी करणार कंपन्या

1. आर्थिक वर्षात कंपन्यांसाठी महागाई दर 3-4% पर्यंत खाली येण्याची अपेक्षा आहे.
2. मार्चपर्यंतच्या दोन आर्थिक वर्षांत एफएमसीजी कंपन्यांसाठी महागाई 30% वर पोहोचली होती.
3. जानेवारी-मार्च तिमाहीत कच्च्या मालाची महागाई आधीच 6-7% पर्यंत खाली आली.
4. एफएमसीजी कंपन्या आता मार्जिनऐवजी विक्री वाढवून उत्पन्न वाढवण्यावर भर देतील.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या