मुखपृष्ठ Top News गौतमी पाटीलला करायचंय लग्न; म्हणाली- “त्याच्याशी लग्न करेन कारण…”

गौतमी पाटीलला करायचंय लग्न; म्हणाली- “त्याच्याशी लग्न करेन कारण…”

by PNI Digital

मुंबई : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नाव अल्वावधीतच लोकप्रिय झालं आहे. गौतमीचा डान्स पाहायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. ती नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय, यामागील कारण म्हणजे तिचं लग्न. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौतमीनं पहिल्यांदा तिच्या लग्नाविषयी सांगितलं. इतकंच काय तर तिला कसा नवरा हवा आहे याचा खुलासा देखील तिनं केला आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली,”माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे”.

गौतमीला कसा नवरा हवा?

गौतमी पुढे म्हणाली,”मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी 25 वर्षांची असून माझं लग्न झालेलं नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे”.

गौतमी पाटील चित्रपटात झळकणार

गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका होतो. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना वेड लावलं आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असली तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर फोकस ठेवला आहे. गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या