मुखपृष्ठ Top News मराठी चित्रपटाला थिएटर नाकारलं! TDM च्या समर्थनार्थ पुणेकरांनी काढला भव्य ट्रॅक्टर मोर्चा

मराठी चित्रपटाला थिएटर नाकारलं! TDM च्या समर्थनार्थ पुणेकरांनी काढला भव्य ट्रॅक्टर मोर्चा

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): टीडीएम चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटास चांगल प्रतिसाद मिळूनही चित्रपटाचे शो थांबविण्यात आले. थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या कलाकारांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. तरी देखील त्यांच्या चित्रपटाला शो मिळाले नाहीत. मात्र या चित्रपटाला शो मिळावे यासाठी पुण्यात नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर रॅली काढली होती. एखाद्या चित्रपटाच्या समर्थनासाठी नागरीक एकवटल्याचे दुर्मिळ चित्र यावेळी दिसून आले.

‘टीडीएम’ चित्रपट पुण्यात दणक्यात प्रदर्शित झाला. त्यांच्या आजवरच्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी तितकंच उचलून धरलं पण चारच दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्यात आला. तर अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला. यामुळे अक्षरशः भाऊराव प्रेक्षकांसमोर हात जोडून रडले आणि त्यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. पण शिरूरकरांनी मात्र भाऊरावांची साथ द्यायचं ठरवलं आणि ते ‘TDM’च्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. यावेळी शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

शेतकरी बनला चित्रपट निर्माता

भाऊराव कऱ्हाडे हे शिरुर परिसरातील गव्हाणेवाडी येथील आहेत. अत्यंत वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार करून त्यांनी संबंध भारताचे लक्ष वेधले. त्यांच्या ‘ख्वाडा’ या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर ‘बबन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर दणदणीत कमाई करणारा चित्रपट ठरला होता. शेतकरी, रिक्षाचालक, वीटभट्टी मजुर ते चित्रपटसाठी शेत जमीन विकणारा ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता असा भाऊरावांचा खतदार प्रवास आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या