नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. बिश्नोईने गुंड गोल्डी ब्रारच्या मदतीने गोगी टोळीला 2 जिगाना पिस्तूल दिल्याचे सांगितले. गँगस्टर बिश्नोईने त्याच्या हिटलिस्टमध्ये समाविष्ट असलेली नावे केंद्रीय एजन्सीलाही सांगितले.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बिश्नोईने अनेक मोठे खुलासे केले होते. बिश्नोई सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीदरम्यान बिश्नोईने त्याच्या टॉप 10 हिटलिस्टची नावेही उघड केली. या यादीत बॉलिवूड अभिनेता सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर सिद्धू मुसेवालाचे व्यवस्थापक आहेत.
बिश्नोईची हिट लिस्ट, टॉप 10 टार्गेट्स
1- सलमान खान
2- शगुनप्रीत (सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर)
3- मनदीप धालीवाल (लकी पटियालचा हस्तक)
4- कौशल चौधरी (गँगस्टर)
5- अमित डागर (गँगस्टर)
6- सुखप्रीत सिंग बुद्धा (बंबिहा टोळीचा नेता)
7- लकी पटियाला (गँगस्टर)
8- रम्मी मसाना (गँगस्टर)
9- गुरप्रीत शेखो (गँगस्टर)
10 – भोलू शूटर, सनी लेफ्टी, अनिल लठ (विकी मुद्दुखेडाचे मारेकरी)
विकी मुद्दुखेडाच्या हत्येने लॉरेन्स नाराज झाला होता. या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने ऑक्टोबर 2021 मध्ये तीन शूटर्सना मुसेवालाच्या गावात पाठवले. दरम्यान, बिश्नोई हा गँगस्टर गोल्डी ब्रारच्याही संपर्कात होता. मुसेवाला याच्या हत्येसाठी बिष्णोईने ब्रारला 50 लाख रुपये दिले होते.
सलमान खानला का मारायचे आहे?
केंद्रीय एजन्सीच्या चौकशीदरम्यान, बिश्नोईने भरतपूर, फरीदकोट आणि इतर कारागृहात राहताना राजस्थान, चंदीगड आणि अंबाला येथील व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचेही उघड केले. विशेष म्हणजे एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिश्नोई याने स्पष्टपणे सांगितले होते की, मला सलमान खानला मारायचे आहे. राजस्थानमधील हरण शिकार प्रकरणाचा संदर्भ देताना बिष्णोईने हे वक्तव्य केले होते. तो म्हणाला की तो अजून गुंड बनला नाही. जेव्हा सलमान खानला मारेल, तेव्हा तो गुंड होईल. बिष्णोई समाजाचे धार्मिक स्थळ असलेल्या गुरू जंभेश्वर धाम मुक्तिधामची सलमान खानने माफी मागितल्यास त्याला माफी मिळू शकते, असेही तो म्हणाला होता.