मुखपृष्ठ Top News मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, अल्वपयीन मुलीचा मृत्यू; पाच जण जखमी

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, अल्वपयीन मुलीचा मृत्यू; पाच जण जखमी

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): मुंबई-पुणे महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने आयशरला मागून जोरदार धडक दिली. या कारमध्ये असणाऱ्या सहा प्रवासींपैकी एका 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर झाले आहेत आणि इतर तीन किरकोळ जखमी झाले आहेत. उर्से टोल नाक्याजवळ ही अपघाताची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवरून पुण्याच्या दिशेने कार येत होती. रस्त्यावर वाहनांची फार गर्दी नसल्याने कार भरधाव वेगात होती. अपघात झालेला कार चालक देखील आपली कार वेगात चालवत होता. त्यामुळे समोर उभ्या असलेल्या टेम्पोला या भरधाव कारने जोरदार धडक दिली. जोरदार धडक दिल्याने मागच्या बाजूला अडकली. कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना काही कळायच्या आत ही घटना घडली. या कारमध्ये प्रवास करत असणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं आहे.

महिनाभरातील दुसरी घटना

घटनास्थळी आय.आर. बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस आणि राणी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा पुढील भागचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान तीन आठवड्यापूर्वी याच परिसरात असाच अपघात झाला होता, तेव्हा तीन प्रवाशांचा जीव गेला होता. त्यावेळी चारचाकी थेट ट्रकला धडकली होती. अख्खी गाडी ट्रक खाली गेल्याचं तेव्हा पाहायला मिळालं होतं.

 

 

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या