मुखपृष्ठ Top News पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; दोन हजाराच्या नोटेला हार घालत वाहिली श्रध्दांजली

पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; दोन हजाराच्या नोटेला हार घालत वाहिली श्रध्दांजली

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून दुसरी नोटबंदी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटेला हार घालत श्रध्दांजली वाहण्यात आली. तर एका कार्यकर्त्याने प्रतिकात्मक 10 लाख रुपये किंमतीच्या 2 हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून निषेध नोंदविला.

यावेळी कार्यकर्त्यांनी दोन हजार रूपयांच्या नोटांना श्रध्दांजली वाहून “परत द्या परत द्या , नोटेतील चिप परत द्या” “चांगभल चांगभल नोटबंदीच्या नावाने चांगभल “ “यु टर्न सरकार… मोदी सरकार “ “नोटबंदी कशाला कसबा कर्नाटकचा बदला घ्यायला”, या घोषणा दिल्या.

नोटबंदीमधून काय साध्य होणार?

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे काळा पैसा बाहेर येईल, असे त्यावेळी भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, नोटबंदीमधून काहीच साध्य झालं नाही. उलट बँकेच्या रांगेत थांबून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. आता कर्नाटक राज्यात झालेल्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून काय साध्य होणार आहे. हे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावं, अशी मागणी देखील जगताप यांनी केली.

आंदोलनात यांचा होता सहभाग

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, बाळासाहेब बोडके, अजिंक्य पालकर, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, सुषमा सातपुते, महेश हंडे, शालिनी जगताप, कुलदिप शर्मा, शुभम माताळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या