मुखपृष्ठ Top News भारताची नीतू घंघास बनली वर्ल्ड चॅम्पियन; बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक

भारताची नीतू घंघास बनली वर्ल्ड चॅम्पियन; बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक

by PNI Digital

नवी दिल्ली : जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताच्या नीतू घंघासने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. नीतूने 48 किलो वजनी गटात मंगोलियन बॉक्सर लुत्साईखानला हरवून सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या विजयामुळे बॉक्सिंग खेळाडूंमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

नीतू घंघासने मंगोलियाच्या लुत्साईखानचा 5-0 असा पराभव केला आहे. दरम्यान, हा सामना अतिशय रोमांचक झाला. फायनल सामन्यात नीतू सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवताना दिसली. पहिली फेरी 5-0 ने जिंकल्यानंतर नीतूने लुत्साईखानला दुसऱ्या फेरीत पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. विरोधी बॉक्सरने शर्तीचे प्रयत्न केले, पण नीतूने आपला दबदबा कायम राखला. दुसरी फेरी नीतूने 3-2 अशी जिंकली.

तिसऱ्या फेरीत पटकावले विजेतेपद

यानंतर, तिसर्‍या फेरीत तिने पायाची चांगली हालचाल दाखवली आणि लुत्साईखानच्या आक्रमक खेळीतून स्वतःचा बचाव केला. अशाप्रकारे तिसरी फेरी जिंकून नीतूने विजेतेपद पटकावले. नीतूचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.

वर्ल्ड चॅम्पियन बनणारी सहावी बॉक्सर

दोन्ही खेळाडूंनी अतिशय चांगली लढत दिल्यामुळे, प्रेक्षकांना शेवटपर्यंत विजेत्याचा अंदाज लावणे कठीण जात होते. मोठ्या ताकदीच्या खेळानंतर अखेरीस भारताच्या नीतूला विजयी घोषित करण्यात आले. या विजयानंतर नीतू घंघास वर्ल्ड चॅम्पियन बनणारी सहावी भारतीय बॉक्सर ठरली आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या