मुखपृष्ठ Top News धक्कादायक! DRDO संचालकाच्या मोबाईलमध्ये सापडले अश्लील फोटो

धक्कादायक! DRDO संचालकाच्या मोबाईलमध्ये सापडले अश्लील फोटो

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले आहे. पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात ते सापळले. आता एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. पुणे एटीएसला प्रदीप कुरुलकरच्या मोबाइलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो मिळाले आहे. तसेच त्याच्या बँकींग व्यवहाराची तपासणी सुरु केली आहे.

पुणे एटीएसने बँकेचे सगळे व्यवहार सील केले आहे. त्याची बँकिंग प्रणाली ताब्यात घेऊन ती फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहे. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिच्याशी संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन महिलांचे जबाब नोंदवले आहे.

ईमेलद्वारे पाकिस्तानला दिली माहिती

प्रदीप कुरुलकर याच्या मोबाईलची तपासणी सुरु आहे. या तपासणीत महिलांचे अर्धनग्न फोटो मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कुरुलकर याने व्हॉटस ॲपवरूनचं मेल आयडी दिल्याचं उघड झाले आहे. त्याचं कंट्री लोकेशन पाकिस्तान दिसत आहे. कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. त्या अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या