मुखपृष्ठ Top News पुण्यात IPL मॅचवर लाखोंची कमाई; सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई

पुण्यात IPL मॅचवर लाखोंची कमाई; सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे – प्रतिनिधी): पुणे शहरात आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी धाड टाकत सट्टा लावणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जुगार अड्यावर धाड टाकून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करत 9 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चेन्नई आणि मुंबई इंडियन्सचा सामना सुरु होता. या सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाली. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील ब्रह्मा अंगण बिल्डिंगमध्ये बुकी आयपीएलवर सट्टा घेत होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सापळा रचत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या 9 जणांना अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यावेळी पाच लाखाचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सट्टा जुगारी पोलिसांच्या रडारवर

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने कारवाई केली होती. ही कारवाई येरवड्यातील गुंजन टॉकीजजवळ 6 एप्रिल रोजी केली. आरोपींकडून सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपी धरमपाल गोयल याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पुण्यातील अनेक बडे बुकी पुणे शहर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या