मुखपृष्ठ Top News शहर असो किंवा गाव बँकेत न जाता बदलता येणार 2000 च्या नोटा, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

शहर असो किंवा गाव बँकेत न जाता बदलता येणार 2000 च्या नोटा, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

by PNI Digital

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने म्हटले आहे की ज्या लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 23 मे 2023 पासून देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन त्या इतर नोटांसोबत बदलून घेऊ शकतात. पण रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मर्यादा निश्चित केल्या आहेत. यानुसार, एकावेळी 20,000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. तथापि, बँकेशिवाय, तुम्ही तुमची 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता… आणि ते ठिकाण म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट सेंटर.

बिझनेस करस्पॉन्डंट सेंटर्स म्हणजे काय?

तुम्हाला ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये बिझनेस करस्पॉन्डंट सेंटर सापडतील. 2006 मध्ये, रिझर्व्ह बँकेने बिझनेस करस्पॉन्डंट्स किंवा बिझनेस फॅसिलिटेटर्स सारख्या बिगर बँक मध्यस्थांच्या वापरास मान्यता दिली होती. या निर्णयामागे रिझर्व्ह बँकेचा उद्देश बँकिंग आणि वित्तीय सेवांची व्याप्ती वाढवणे हा होता. बिझनेस करस्पॉन्डंट बँकेसारखे काम करतात. ते गावकऱ्यांना बँक खाती उघडण्यास मदत करतात आणि व्यवहारही करतात.

बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट सेंटरमध्ये एक्सचेंज लिमीट

तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही बँकेत न जाताही त्या बदलून घेऊ शकता. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँक खातेदार एका दिवसात 4000 रुपयांच्या मर्यादेत बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरद्वारे 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात. यासाठी तुमचे खाते असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, बँकेच्या शाखेत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी बँक खाते असणे बंधनकारक नाही.

बँकेत किती नोटा बदलता येणार

रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे म्हटले आहे की, देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून कोणतीही व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकते. म्हणजेच बँकेत खाते असणे आवश्यक नाही. नोटा बदलण्याची सुविधा मोफत असेल असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नोटा एकावेळी बदलल्या जाणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत RBI हळूहळू बाजारातून 2000 च्या नोटा काढून घेईल.

 

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या