मुखपृष्ठ Top News सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये 291 पदांसाठी होणार भरती

सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये 291 पदांसाठी होणार भरती

by PNI Digital

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली असून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आरबीआय ग्रेड बी भरती मोहिमेंतर्गच एकूण 291 रिक्त जागांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने बँकेची अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in जाऊन अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, 9 जून 2023 पर्यंत रात्री 6 वाजेपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. ही भरती अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल, डीईपीआर, डीएसआईएमस या पदांसाठी होणार आहे. अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरलसाठी 222 पदे, अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआरसाठी 38 पदे, अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएमसाठी 31 पदे, आरबीआय ग्रेड बी- जनरल फेज 1 परिक्षा 9 जुलै आणि ग्रेड बी डीईपीआर आणि डीएसआयएम च्या परिक्षा 16 जुलै 2023 ला आयोजित केल्या जातील.

शैक्षणिक पात्रता

आरबीआय ग्रेड बी-जनरल पदासाठी 60% गुणांसह बॅचलर पदवी मिळवणे गरजेचे आहे. तर, डीईपीआर आणि डीएसआयएम पदासाठी उमेदवाराने पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

वयोमर्यादा

आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 1 मे 2023 ला 21 वर्ष ते 30 वर्षातंर्गत असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेतमध्ये सुट देण्यात आली.

अर्ज कसा करावा

– RBI च्या opportunities.rbi.org.in या वेबसाईटवर भेट द्या.
– रिक्त पदांवर जा आणि ग्रेड B साठी लिंकवर क्लिक करा.
– आयबीपीएस पोर्टलवर नोंदणी करा.
– फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
– पुढील माहितीसाठी प्रिंटआउट घ्या.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या