मुखपृष्ठ Top News UPSCने जारी केली भरतीची अधिसूचना; जाणून घ्या आवश्यक पात्रता

UPSCने जारी केली भरतीची अधिसूचना; जाणून घ्या आवश्यक पात्रता

by PNI Digital

मुंबई : संघ लोकसेवा आयोगाने UPSC CDS भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार 6 जूनपर्यंत UPSC CDS II 2023 भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 349 पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. यात प्रामुख्याने इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून 100 पदे, इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला 32 पदे, एअर फोर्स अकादमी, हैदराबाद 32 पदे, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई 185 पदे, आदी पदांची भरती करण्यात येणार आहे.

शुल्क किती लागणार

या भरती प्रक्रियेकरीता अर्ज करण्यासाठी, SC/ST आणि महिला उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज

– अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रियेचा करावा. – सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
– त्यानंतर ‘UPSC CDS 2 2023’ लिहिलेल्या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा.
– होमपेजवर उपलब्ध ‘ऑनलाइन अर्ज करा’ वर क्लिक करा.
– आता, संबंधित लिंकवर क्लिक करा आणि अर्ज उघडेल.
– त्यात नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा.
– कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा. – शेवटी तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या