मुखपृष्ठ Top News पुन्हा नोटबंदी! 2 हजाराची नोट बंद होणार; 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत

पुन्हा नोटबंदी! 2 हजाराची नोट बंद होणार; 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत

by PNI Digital

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकने 2 हजाराच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, 30 सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. सन 2018-19 मध्येच 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. नागरिकांना 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2 हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी काही मर्यादा देखील आखून देण्यात आल्या आहेत. प्रत्येकजण एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट अकाउंटधारक एका दिवसाला चार हजार रुपयांपर्यंतचा नोटा प्रत्येकी एका दिवसाला बदलून घेऊ शकतात. याचा अर्थ बँकेत करंट अकाउंट असलेल्या ग्राहकांना दर दिवसाला चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळू शकतात.

बँकांना विशेष व्यवस्था करावी लागणार

आरबीआयने सांगितले की, 23 मे पासून एकावेळी केवळ 20 हजार रूपयांच्याच 2 हजाराच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 19 शाखा उघडणार आहे. 2 हजारच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाणार नाहीत.

2 हजाराची नोट कधीपासून चलनात?

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीनंतर 2 हजार रुपयांची नोट चलनात आली होती. नोटबंदीमध्ये 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. यावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत सरकारने विचार न करता हा निर्णय घेतल्याची टीका केली होती.

 

 

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या