मुखपृष्ठ Top News पुण्यातील बँकेवर RBI ची कारवाई; सहकार क्षेत्रात उडाली खळबळ

पुण्यातील बँकेवर RBI ची कारवाई; सहकार क्षेत्रात उडाली खळबळ

by PNI Digital
RBI Bank File Photo

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): भारतीय रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना दंड केला आहे. या चार बँकांना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एकूण 44 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये पुण्यातील एका बँकेवरही कारवाई केल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘ठेवींवर व्याजदर’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल पुणे शहरातील सहकारी बँकेला दंड केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने चेन्नई येथील तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेला 16 लाखांचा दंड केला आहे. याशिवाय आरबीआयने बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला दंड केला आहे. पुणे येथील जनता सहकारी बँक आणि राजस्थानमधील बारन येथील बरण नागरीक सहकारी बँक या तीन बँकांनाही दंड ठोठावला आहे.

‘या’ बँकांवर केली कारवाई

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला 13 लाखांचा दंड केला गेला आहे. एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये मुदतीत रक्कम टाकली गेली नाही. ‘ठेवांवर व्याज दर’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल पुणे येथील जनता सहकारी बँकेला 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण बँकेने रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये निर्धारित कालावधीत हस्तांतरित केली नाही. नाबार्डला फसवणुकीचा अहवाल बँकेला ठराविक मुदतीत दिला नाही. तसेच काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बरण नागरीक सहकारी बँक, बारण राजस्थानला 2 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या