मुखपृष्ठ Top News खुशखबर! यंदा मान्सून तीन दिवस अगोदर धडकला, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार आगमन

खुशखबर! यंदा मान्सून तीन दिवस अगोदर धडकला, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार आगमन

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरात तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. त्यामुळे उकाडा जाणवत असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात आता लोक पावसाची आतुरतेनं वाट पाहू लागले आहेत. केव्हा पाऊस पडेल अन् उकाड्यातून सुटका होईल अशी सर्वसामान्यांची अवस्था झाली आहे. यासंदर्भात हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात १९ मे रोजी आगमन झाले. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून

मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील पोहचला आहे. यामुळे यावर्षी मान्सून तीन दिवस उशीरा येणार होता. परंतु आता त्याची चाल अनुकूल राहिली तर केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होईल. हवामान विभागाने केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला येणार होता. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्यात ९६ टक्के पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.

 

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या