मुखपृष्ठ Top News उत्कृष्ट अभिप्राय…! जूचंद्रच्या शिक्षिका स्मिता पाटील यांची 32 जिल्ह्यातून निवड

उत्कृष्ट अभिप्राय…! जूचंद्रच्या शिक्षिका स्मिता पाटील यांची 32 जिल्ह्यातून निवड

by PNI Digital
Juchandra Smita Patil

वसई (प्रवीण म्हात्रे-प्रतिनिधी) : कोरोना काळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुरु रहावा, यासाठी राज्यातील शिक्षकांनी वेगवेगळ्या स्वरुपात आपल्या कल्पकतेने मोलाचे योगदान दिले आहे. त्या शिक्षकांच्या विचारांना आणि कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ऑनलाईन राज्यस्तरीय शिक्षण महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.

जूचंद्र येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका स्मिता पाटील यांची 32 जिल्ह्यातून उत्कृष्ट अभिप्राय म्हणून निवड झाली आहे. आनंदी शाळा सक्षमीकरण शिक्षण महोत्सव कार्यक्रमातून ही निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमधून एकूण 683 शिक्षक वैयक्तिक पातळीवर विविध ऑनलाईन स्पर्धामध्ये सहभागी झाले होते. त्यातून जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता पाटील यांची शिक्षण महोत्सवात उत्कृष्ट अभिप्राय म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्मिता पाटील यांचं सर्वत्र कौतुक
स्मिता पाटील या उपक्रमशील शिक्षिका असून विद्यालयात अनेक शासकीय उपक्रमामध्ये सक्रिय आहेत. त्या उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि संवादिका म्हणून परिचित आहेत. त्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, रायगड विभागाचे चेअरमन आणि कोकण शिक्षण संघाचे आमदार बाळाराम पाटील, मॅनेजिंग काऊन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी सचिव गणेश ठाकूर, विद्यमान सचिव शिवणकर, कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आत्तार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, विद्यालयाचे प्राचार्य तळपाडे, प्राचार्य श्री. राजमाने, रायगड विभाग अधिकारी संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी फडतरे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी, सदस्य आजी-माजी विद्यार्थी संघटना या सर्वांनी स्मिता पाटील यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

1 टिप्पणी
1

related posts

1 टिप्पणी

हर्ष पाटील April 1, 2021 - 10:16 am

अभिनंदन ताई 💐

Reply

एक टिप्पणी द्या