मुखपृष्ठ Top News सर्वोच्च न्यायालयात जुंपली पैलवान अन् महासंघाच्या अध्यक्षांची ‘कुस्ती’, ब्रजभूषण शरण सिंगवर FIR ची मागणी

सर्वोच्च न्यायालयात जुंपली पैलवान अन् महासंघाच्या अध्यक्षांची ‘कुस्ती’, ब्रजभूषण शरण सिंगवर FIR ची मागणी

by PNI Digital

नवी दिल्ली: न्यायाची मागणी करत जंतरमंतरवर बसलेल्या पैलवानांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यासाठी कुस्तीपटू विनेश फोगटसह अन्य सहा महिला कुस्तीपटूंनी याचिका दाखल केली असून, यापूर्वीच एफआयआर नोंदवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात, याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा आहेत, ते मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर त्यांच्या वतीने याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणार आहेत.

21 एप्रिल रोजी पोलीसात तक्रार

कुस्तीपटूंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 21 एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार देऊनही पोलिसांनी त्याच्या विनंतीवरून एफआयआर नोंदवला नाही. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी कुस्तीपटू गेल्या तीन महिन्यांपासून करत आहेत. 21 एप्रिलच्या तक्रारीवरही कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा कुस्तीपटू जंतरमंतरवर जमले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. याआधीही जानेवारी 2023 मध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू जंतरमंतरवर जमले होते आणि त्यांनी आपली बाजू मांडली होती.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. यासोबतच महासंघाच्या अध्यक्षांवर हुकूमशाही आणि मनमानी कारभाराचा आरोपही करण्यात आला आहे. जंतर-मंतरवर झालेल्या पत्रकार परिषदेत विनेश फोगट म्हणाली की, तिच्यासह अनेक कुस्तीपटूंना मानसिक छळ होत आहे. आपण सुरक्षित नाही तर सुरक्षित कोण? असा सवालही तिनं केलाय.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या