मुखपृष्ठ Top News पुणे हादरले! कुख्यात गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

पुणे हादरले! कुख्यात गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पिंपरीच्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीत ही गोळीबार आणि हत्येची घटना घडली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ घडली असून, कृष्णा उर्फ सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोन्या तापकीरला उपचारासाठी तातडीने इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होता. मात्र गंभीर जखमी झालेल्या सोन्या तापकीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोन्यावर नेमका कुणी हल्ला केला याचा तपास पोलीस घेत आहेत.

महिनाभरातील दुसरी घटना

याच महिन्यामध्ये तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. वडिलांचा अपमान केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाच्या मुलानेच ही हत्या घडवून आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने मित्रांच्या मदतीने हा खून केला, असा दावा पोलिसांनी केला.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या